माण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या आरोग्य तपासणी हितकारक-संचालक एम.डी. दडस

प्रतिनिधी

दहिवडी

कोणतीही गोष्ट सक्षमपणे पेलण्यासाठी आरोग्य महत्त्वाचे असते आणि त्या आरोग्यासाठी नियमित तपासणी हे तितकीच उपयुक्त ठरते असे मत कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे संचालक एमडी दडस यांनी व्यक्त केले माण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने संजीवनी आयुष हॉस्पिटल पुणे व माधवबाग यांच्या मार्फत आयोजित आरोग्य तपासणी शिबिरा प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत दोरगे सर मान तालुका अध्यक्ष संतोष घोडके प्राथमिक शिक्षक बँक संचालक नितीन काळे हनुमंतराव जगदाळे रमेश सुतार शाखाप्रमुख खाडे संगीता रुपनवर, प्राचार्य बबन खडे क्रीडाशिक्षक ज्ञानेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते. एमडी दडस मनाली की, देशाला सक्षम पिढी घडवण्यासाठी शिक्षकांचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी माण तालुका शिक्षक समितीच्या वतीने आयोजित केलेले आरोग्य शिबिर उपयुक्त ठरणार आहे. अध्यक्ष संतोष घोडके म्हणाले की शिक्षण क्षेत्रात काम करताना शारीरिक कष्ट कमी असले तरी मानसिक ताण खूप असतो अशावेळी यातून आरोग्य राखण्यासाठी प्रत्येकाच्या दृष्टीने वेळेत रक्त तपासणी व्हावी याकरता संघटनेच्या माध्यमातून हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते यापुढेही शिक्षकांच्या हितासाठी संघटना कायम कार्य करत राहील. शिक्षक बँक संचालक नितीन काळे म्हणाले की, शिक्षक बँकेच्या माध्यमातून सभासदांसाठी विविध चांगले उपक्रम राबवण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असून, वर्धापन दिनाच्या निमित्ताने सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर उपाध्यक्ष श्रीकांत दोरगे यांनी मान तालुका संघटनेने केलेल्या कामासाठी कौतुक करून यापुढेही त्यांनी असेच चांगले कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या. शिक्षक बँकेचे माझे व्हाईस चेअरमन हनुमंतराव जगदाळे यांनी तालुका संघटनेने आजपर्यंत अनेक चांगली कामे केली आहे ती यापुढेही करत राहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

कु. अक्षता आबासाहेब ढेकळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूला शिवछत्रपती राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार जाहिर

फलटण दि. 15: वाखरी, ता. फलटण या कायम दुष्काळी पट्ट्यातील छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेली कु. अक्षता आबासाहेब ढेकळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूला महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सर्वोच्च मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर झाला असून या घोषणेनंतर कु. अक्षता ढेकळे हिचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.३ लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.या कार्यक्रमाला महाराष्टाचे महामहीम राज्यपाल श्री.सी.पी.राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार, श्री.एकनाथजी शिंदे, क्रीडामंत्री श्री.दत्तमामा भरणे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.हा शासकीय नियोजित कार्यक्रम दिनाक १८ एप्रिल २०२५ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित केला आहे.शिवछत्रपती हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार सुमारे ३० वर्षानंतर कु. अक्षता ढेकळे या गुणी खेळाडूच्या रुपाने हॉकीला मिळाला आहे.

कु. अक्षता आबासाहेब ढेकळे हिने मोठ्या मेहनतीने अल्पावधीत आंतरराष्ट्रीय हॉकी सुवर्ण कन्या असा नावलौकिक प्राप्त करीत भारतीय महिला हॉकी संघाचा दबदबा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे.सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि वल्ड कप सिल्व्हर मेडल प्राप्त खेळाडू असा कु. अक्षता ढेकळे हिचा परिचय आहे. तिने आतापर्यंत साऊथ अमेरिका, नेदर ल्यांड्स,बेल्जियम, इंग्लंड, स्पेन, ओमान, साऊथ आफ्रिका, फ्रान्स वगैरे देशातील ९ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारतीय संघातून खेळत भारतीय हॉकी ची उज्वल परंपरा जगासमोर ठेवली आहे.

कु. अक्षता ढेकळे ही आशिया कप गोल्ड मेडलिस्ट, वर्ल्ड कप सिल्व्हर मेडलिस्ट, राष्ट्रीय गोल्ड मेडलीस्ट असून तिने अल्पावधीत ९आंतरराष्ट्रीय, २४ राष्ट्रीय, १३ राज्यस्तरीय मेडल्स मिळविली आहेत.एकाच वर्षात सिनिअर व ज्युनिअर वल्ड कप मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारी पहिली महिला हॉकी खेळाडू आणि सर्वात कमी वयात सिनिअर वल्ड कप मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी तरुण खेळाडू हा बहुमान मिळविण्यात कु. अक्षता ढेकळे यशस्वी झाली आहे.